Posts

ज्वालामुखी केला प्राशन!

          ज्वालामुखी केला प्राशन!      एकदा एक मोठा प्रसंग उभा राहिला. प्रत्यक्ष अग्नीने ज्वालामुखीच्या रुपात आग ओकायला सुरुवात केली. नागरिकांना उष्णतेचे चटके सहन होत नव्हते. ज्वालामुखीचा डोंगर तयार झाला होता. चुलीतील लाकडे आपोआप पेटत होती. डोंगराच्या कपारी खाली कोसळल्या. घरे, गाव पेटण्याची चिन्हे दिसत होती. हनुमानाने विचार केला, 'हा ज्वालामुखी थांबवला नाहीतर हा असाच चोहीकडे पसरत जाईल. किती नुकसान होईल, किती लोकांचे प्राण जातील सांगता येत नाही. लोकं घर सोडून पळू लागले. बाल हनुमानाने ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने उड्डाण केले. त्याने त्या पेटलेल्या डोंगराचे मोठमोठे भाग वेगळे करायला सुरुवात केली.       तिकडे केसरीराजा आणि अंजनी हनुमानाला शोधत होते. त्यांना हनुमानाचे मित्र भेटले. केसरीने विचारले, "मारुती कुठे आहे?" "त्याने आम्हाला अग्नीपासून वाचवले आहे. तो आता त्या आगीने पेटलेल्या पर्वताच्या दिशेने गेला आहे. तो त्या आगीला शांत करणार आहे." "हा आपला मारुती...." अंजनी काहीतरी बोलणार तितक्यात कुणीतरी ओरडले, "महाराज, बघा. त्या आगीच्या ज्...